ISA NCB सोबतचा एक प्रत्याय
रश्मी म्हणाली मॅडम तुमचा ISANCB चा अनुभव लिहा. अन मी विचार करू लागले गेल्या ४५ वर्षाचा काळ चित्रपटासारख्या झरझर सरकू लागला. काय सांगू अन काय नको असं झालं.
महत्वाचे टप्पे सांगते, सर्वात पहिले कधी आला माझा ISANCB शी संबंध, मी GMCN Anasthesia Dept ला House Officer होते १९७४ मध्ये ३ वाजता दुपारी डॉ आर. के. प्रधान (HOD प्रोफेसर) रूम जवळ गडबड दिसली. श्रीराव सरांना विचारलं काय आहे? ते म्हणाले ANESTHESIA सोसायटी ची मिटिंग आहे. आपण Anasthecia Dept. ला आहे जायलाच हवं. श्रीराव सर म्हणाले तुमचं काही काम नाही. आता हसू येत पण तेव्हा वाईट वाटलं, का नाही; नंतर कळलं ISANCB काय मेम्बरशिप म्हणजे काय वैगेरे. तेव्हा ISA च्या मिटिंग ला ७-८ मेंबर्स होते. डॉ आर के प्रधान सर प्रेसिडेंट ISANCB होते. माणकेश्वर मॅडम सेक्रेटरी होत्या बाकी मेंबर्स श्रीराव सर, घोष सर, सहाय सर, सहाय मॅडम, बाळंके सर, हरदास सर, एवढ्याश्या बीजाचा आज वटवृक्ष झाला. इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेल गेला गगनावरी.
नंतर मी अनेस्थेशिया स्पेशियालिटी घ्यायची ठरवली. पूर्वी आधी DA करावं लागायचं, नुकताच MD ऍनेस्थेशिया सुरु झालं होत फक्त दोन रजिस्ट्रेशन होते त्यामुळे आधी सिनिअर ला चान्स त्यामुळे DA झालेल्याना MD करता रेजिस्ट्रेशन देत असत.
DA झाल्यावर १९७५ डिसेम्बर ला मी ISANCB ची मेंबर झाली. त्यानंतर २-३ वर्षांनी Executive मेंबर झाली. नंतर ३ वर्षे डॉ आशुतोष चावजी सेक्रेटरी असताना Tresurer होते. मग डॉ मशानकर प्रेसिडेंट असताना Vice प्रेसिडेंट होते १९९५-९६ दोन वर्षे प्रेसिडेंट होते. अगदी सुरवातीच्या काळात जेमतेम एका वर्षात ५-६ कार्यक्रम होत असत. Annual Day, MD, DA परीक्षांकरता जे EXAMINER यायचे त्यांचे लेक्चर बहुदा ठेवल्या जायचे २५ ते ३० मेंबर्स असत. बरेच वर्षे आपलं स्वतंत्र ऑफिस नव्हतं. सर्व महत्वाचे कागद, फाइल्स, सेक्रेटरी च्या घरीच राहत असत. माझ्या बेडखाली सर्व ऑफिस फाइल्स ISANSB च्या ठेवल्या होत्या. हळूहळू सर्वांच्या परिश्रमांनी सुधारणा होत गेल्या. आपलं ऑफिस, IMA मध्ये बऱ्याच प्रयत्नांनी पैशाची जमवाजमव करून आपल्याला मिळालं, हळूहळू मेंबर्स चा नंबर वाढत गेला. कार्यक्रमाची संख्या वाढत गेली अन कार्यक्रमाचे स्वरूप सुद्धा सुधारलं.
लक्षात राहण्यासारखे म्हणजे स्टेट कॉन्फरेन्स १९८४, नॅशनल लेवल ची पेन कॉन्फरेन्स, ISA नॅशनल कॉन्फरेन्स २००० मध्ये झाली GMC नागपूर, VMY होता, २००६ मध्ये WISACON झाली, खूप चांगला प्रतिसाद होता.
गेल्या २० वर्षात सर्वांच्या सहयोगानी ISANCB खूप छान, कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. स्टेट अन राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट ब्रँच म्हणून बक्षिसे मिळतात आहेत राष्ट्रीय पातळीवर भरपूर कौतुकास्पद बक्षिसे मिळाली आहेत.
अशीच प्रगती ISANCB ची होत राहावी अन कीर्ती जागतिक पातळीवर असावी हि ईश्वर चरणी प्रार्थना.
By डॉ रंजना देशमुख
President, ISA-NCB [1995 – 96]