Our Social Mission: No Tobacco for Safe Anaesthesia
Dr. Sachin Jambhorkar
Consultant Anaesthesiologist & Pain Specialist,
National Cancer Institute, Nagpur.
“मैं जिंदगी का साथ निभाता चला गया।
हर फिक्र को धूएं में उडाता चला गया”…..
देखणा देवानंद या ओळी म्हणत पडद्यावर धूम्रवलये सोडतो आणि हजारो तरुण त्याची नक्कल करत आणि ‘live life kingsize’ सारख्या जाहीरातींना बळी पडत स्वतःच्या जीवनाची तंबाखूमुळे अक्षरशः राखरांगोळी करुन घेतात. त्यांच्या भाळी ‘जिंदगीका साथ निभाना’ नाही तर
“मौत का साथ निभाता चला गया।
बरबादीयोंका जश्न मनाता चला गया। “
एवढेच म्हणणे शिल्लक राहते….
चित्रपटांनी आणि जाहिरातींनी वलयांकित केलेलं धूम्रपान आणि तंबाखूसेवन प्रत्यक्ष आरोग्यासाठी आणि शस्त्रक्रियेसाठीची भूल घेताना कसे हानीकारक आहे, हे या लेखात आपण जाणून घेवू या.
दरवर्षी तंबाखूसेवनामुळे जगभरात सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यातील एक-षष्ठमांश म्हणजे सुमारे दहा लाख लोक एकट्या भारतात मृत्युमुखी पडतात. T.B.,HIV/AIDS आणि मलेरिया या तिन्हीमुळे मरणार्यांच्या संख्येपेक्षा एकट्या तंबाखूसेवनामुळे मरणार्यांची संख्या जास्तं आहे. गुप्ता व अन्य यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ३५ ते ६९ या वयोगटातील पुरुषांमधील एकूण मृत्यूंच्या संख्येतील सुमारे २३.७% आणि स्त्रियांमधील ५.७% मृत्यू हे तंबाखूजन्य आजारांमुळे होतात. वर्ष २००९च्या Global Adult Tobacco Survey (GATS) च्या सर्वेक्षणानुसार आज जगातील वय वर्षे १५ च्या वरील एकूण लोकसंख्येच्या ३४.६% लोक (४७.९% पुरुष आणि २०.३% स्त्रिया) हे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.यातील एकूण १४% (यात २४.३% पुरुष व २.९% स्त्रिया) हे धूम्रपान स्वरुपात तंबाखूचे सेवन करतात आणि २५.९% (३२.९% पुरुष व १८.४% महिला) हे अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. भारतातील तंबाखू सेवनाची समस्या ही वैशिष्ट्यपूर्ण असून यात तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा,खर्रा,खैनी आदि विविध स्वरुपात तंबाखूचे सेवन केल्या जाते.
तंबाखूसेवनाचे आरोग्यासाठी दुष्परिणाम:
तंबाखू ही प्रत्येक स्वरुपात आरोग्यासाठी हानिकारकच आहे. International Agency for Research on Cancer च्या अहवालानुसार तंबाखू आणि सिगारेटमुळे फुफ्फुसे, मुख, जीभ,पडजीभ,नाक,स्वरयंत्र,अन्ननलिका(oesophagus), उदर, यकृत, किडनी, स्वादुपिंड, oro and nasopharynx, nasal & paranasal sinuses, युरेटर, युरिनरी ब्लॅडर, गर्भपिशवी आणि बोन मॅरो (मायलाॅईड ल्युकेमिया) आदि कर्करोग संभवतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाने होणार्या मृत्यूमध्ये पुरुषांमध्ये ९९% तर स्त्रियांमध्ये ८०% कारण धूम्रपान हे असते. धूम्रपानामुळे प्रजननसंस्था, हृदय व रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते तसेच Chronic Obstructive pulmonary disease सारखे रोग होतात. भारतातील TB या रोगाच्या ४०% कारणांचा धूम्रपानाशी संबंध जोडता येतो. तंबाखू लागवडीच्या परिसरात काम करणार्या कारागिरांमध्ये ग्रीन टोबॅको सिकनेस नावाचा आजार आढळून येतो जो निकोटिन त्वचेतून शरीरात गेल्यामुळे होतो. तंबाखूमुळे रक्तदाब आणि धडधड वाढते. गर्भावस्थेत तंबाखू सेवन केल्यास मुदतपूर्व प्रसूती,Pre-eclampsia, increased placental weight,बाळाच्या वजनात घट आदि दुष्परिणाम संभवतात. पुरुषांमध्ये वीर्याच्या प्रमाणाची कमी, शुक्राणूंची कमी,शुक्राणूंच्या वेगाची कमी आणि अनैसर्गिक शुक्राणू आदि दोष संभवतात.
तंबाखूसेवनाचे शरीराच्या अन्य विविध संस्थांवर परिणाम:
१] हृदय-रक्ताभिसरण व मज्जासंस्था:
निकोटियाना या जातीच्या ७० हून अधिक प्रजातींपासून तंबाखू तयार केली जाते, ज्यात निकोटियाना टोबॅकम ही प्रमुख प्रजाती आहे. सिगारेटच्या धूरात ४५०० पेक्षा जास्त केमिकल्स असून बाष्प स्वरूपात कार्बन-मोनो-ऑक्साईड आणि घन स्वरुपात निकोटिन हे प्रमुख घातक पदार्थ असतात.
कार्बन-मोनो-ऑक्साईड:
कार्बन-मोनो-ऑक्साईड हा सिगारेट धूरातील प्रमुख बाष्प पदार्थ असून पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचविण्याच्या प्रक्रियेत याचा प्रमुख दुष्परिणाम आढळून येतो. रक्तातील हिमोग्लोबिनसह मिळून हा कार्बाॅक्सीहिमोग्लोबिन नावाचा विषारी पदार्थ तयार करतो आणि शरीराला आवश्यक असणार्या ऑक्सीहिमोग्लोबिनची उपलब्धता कमी करतो.यामुळे रक्ताची पेशींना प्राणवायू पुरवण्याची क्षमता कमी होवून धुम्रपान करणार्या व्यक्तींमध्ये हायपाॅक्सिया किंवा प्राणवायूची कमतरता लवकर होण्याची शक्यता बळावते.
निकोटिन:
निकोटिन हा सिगारेट धूरातील प्रमुख घन पदार्थ असून तो व्यसनप्रवण करणारा (अॅडिक्टिव) आहे. मानवी शरीरातील acetylcholine या पदार्थाशी, जो मज्जासंस्थेच्या दळणवळणात महत्वाची भूमिका बजावतो त्याच्याशी निकोटिनचे भूमितीय साधर्म्य (Structural similarity) आहे. एका सिगारेट मध्ये २ ग्रॅम निकोटिन असते. सिगारेटचा एक कश मारल्यावर २० सेकंदात निकोटिन मेंदूत पोहोचून काम सुरु करते.अॅसिटीलकोलीन रिसेप्टर्सला चालना देवून ते noradrenaline, adrenaline, vasopressin, serotonin, dopamine आणि beta-endorphine आदि पदार्थांचा शरीरात स्राव सुरु करते; ज्यामुळे छातीत धडधडणे सुरु होवून हृदयाची प्राणवायूची गरज वाढते. धूम्रपानामुळे peripheral vascular disease, thromboembolic disease,stroke आणि मेंदूतील रक्तस्त्रावाची शक्यता बळावते. धूम्रपानामुळे कोरोनरी हार्ट डिसीज आणि हृदयविकाराच्या शक्यतेत चारपट वाढ होते.
२] श्वसनसंस्था:
९०% फुफ्फुसांच्या कर्करोगाचे कारण धूम्रपान हे असते. धूम्रपान करणार्या २०% लोकांमध्ये Chronic Obstructive Pulmonary Disease होतो. धूम्रपानामुळे हवेचा मार्ग अतिसंवेदनशील होतो ज्यामुळे भूल देतांना खोकला, श्वास रोखून ठेवणे, laryngospasm आदि जीवघेणे दुष्परिणाम होवू शकतात. कफाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढतो तसेच कफ बाहेर काढण्याचं काम करणारे श्वसनसंस्थेतील केससदृश cilia निकामी होतात. यामुळे कफ छातीत दाटून न्यूमोनिया आणि रेस्पिरेटरी फेल्युअरसारखे घातक दुष्परिणाम भूल देतांना संभवतात.
३] पचनसंस्था:
धूम्रपानामुळे gastro-esophageal sphincter अशक्त होवून gastro-esophageal reflux disease आणि peptic ulcer चे प्रमाण बळावते. तसेच chrohn’s disease आणि ulcerative colitis सारख्या रोगांची शक्यताही बळावते.
४] रोगप्रतिकारशक्ती:
धूम्रपानामुळे रोगप्रतिकारसंस्था अशक्त होते, ज्यामुळे शस्त्रक्रियेचे घाव भरण्यात विलंब आणि इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. याशिवाय धूम्रपानामुळे हाडांचे मेटाबाॅलिजम कमकुवत होते आणि अस्थिभंग जुळून येणे लांबूही शकते.
५] निकोटिनमुळे अनेक औषधांचे मेटाबाॅलिजम प्रभावित होते. जसे theophylline, caffeine, haloperidol,propranolol and volatile agents. नियमित धूम्रपान करणार्या रुग्णांमध्ये अफूजन्य वेदनाशामके जसे माॅर्फिन,फेन्टानिल आदिंची शस्त्रक्रियेनंतर अधिक मात्रेत गरज भासते.
२६,००० रुग्णांमधील एका सर्वेक्षणानुसार धूम्रपान करणार्या २६% रुग्णांमध्ये शस्त्रक्रिये व भूलेदरम्यान श्वसनसंस्थेशी निगडित गुंतागुंत आढळून येते. यात श्वासाची नळी काढल्यानंतर पुनः नळी टाकण्याची पाळी येणे, laryngospasm, bronchospasm, aspiration, hypoventilation and hypoxemia आणि pulmonary oedema आदि गुंतागुंतीचे प्रकार होवू शकतात. शस्त्रक्रियेपूर्वी धूम्रपान करणार्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील मुक्कामातील वाढ, पुनः गडबडीत अॅडमिशन आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात अधिक काळ वास्तव्याची गरजही आढळून येते.
वरील दुष्परिणाम बघता आणि अनेक अभ्यासांअंती हे सिद्ध झाले आहे की शस्त्रक्रियेपूर्वी काही आठवडे तरी धूम्रपान वर्ज्य करणे हे रुग्णासाठी हितकारक आहे.
वरील सर्व वर्णनावरुन हाच बोध घेणे आवश्यक आहे की,